इंदिरा गांधी:

                                        jagtappravin. blogspot. com


                             इंदिरा गांधी:

समर्थ आणि कणखर नेतृत्व:

स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त
आपल्या गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ
तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

इंदिराजींच्या शेवटच्या भाषणात ३० ऑक्टोबर,
१९८४ ला मृत्यूच्या काही तांस आधी त्यांचे शब्द
होते, "आज मी जिवंत आहे, कदाचीत उद्या
नसेनही, शेवटच्या श्वासापर्यंत मी अखंड देशसेवा
करीत राहीन, माझ्या रक्ताचा एक- एक थेंब
देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यासाठी खर्च
पडेल" नियतीच जणू त्यांच्या तोंडून बोलत होती

३१ ऑक्टोबर, १९८४च्या सकाळी आपल्या
निवासस्थातील बागेत फेरफटका मारत
असतांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी ऑपरेशन
ब्लू स्टारचा बदला घेत त्यांची हत्या केली.
श्रीमती इंदिरा गांधी या स्वतंत्र भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. स्वतंत्र भारताच्या
राजकारणाचा विचार करतांना इंदिरा
गांधी यांचा विचार केल्याशिवाय पुढे
जाताच येणार नाही अशी निश्चितच
परिस्थिती आहे. अनेकांना या जागी पं. नेहरू
किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार
करावा असेही वाटेल; परंतु इंदिरा गांधींच्या
वेळेची परीस्थिती आणि त्यांनी ज्या पध्दतीने
निर्णय घेतले, त्यांचा दूरगामी परीणाम लक्षात
घेता इंदिरा गांधीचा भारताच्या
राजकारणावरील प्रभाव निर्णायक होता असे
विधान करणे धाडसाचे ठरणार नाही. मात्र या
पार्श्वभूमीवर हे विधान एका व्यक्तीचा प्रभाव
म्हणूनच केले आहे त्याचा अर्थ तेव्हाच्या किंवा
आताच्या कॉंग्रेस सरकारचे समर्थन करणे असा
नाही हे ही नमूद करणे आवश्यक वाटते.
राजकारणात १९५० पासूनच त्या पं. नेहरुंची
सावली म्हणून वावरत होत्या. १९५५ मध्ये
कॉग्रेसच्या कार्यकारणीच्या सभासद बनल्या
आणि १९६० मध्ये पक्षाध्यक्ष. मात्र १९६६ मध्ये
कॉंग्रेसमध्ये दुफळी माजली होती. अनेक जेष्ठ नेते
विरोधात असतांना १९६७ मध्ये झालेल्या
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान
झाले सुमारे ६० जागा पक्षाने गमावल्या.

२४ जानेवारी, १९६६ रोजी इंदिरा गांधींनी
पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. या घटनेला
47 वर्षे झाली असली तरी कुशल नेतृत्त्व, अचूक
निर्णय क्षमता आणि प्रभावशाली
व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या इंदिरा
गांधींचे आजही स्मरण केले जाते. इंदिरा गांधी
या पंतप्रधानपदापर्यंत कशा पोहचल्या?

यामागे चांगलीच राजकीय खेळी रंगली होती.
ते आपण जाणून घेऊया.
जानेवारी १९६६ च्या घटनाक्रमावर नजर टाकली
तर दिसून येईल की, नेहरुंच्या मृत्यूला जेमतेम २०
महिने होत नाहीत तेवढ्यातच त्यांचे
उत्तराधिकारी लाल बहादूर शास्त्रींचे ११
जानेवारी, १९६६ ला अचानक देहावसान झाले.
भारत पाकिस्तानचे दुसरे युध्द संपून केवळ साडेतीन
महिने झालेले होते, लादल्या गेलेल्या युध्दाचे
भीषण परिणाम उग्र होत होते, महागाई
आकाशाला भिडली होती, बेकारी प्रचंड
प्रमाणात वाढली होती. खाद्यान्नाची फार
मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली
होती. या सर्व आव्हानात्मक बाह्य
परिस्थिती बरोबरच सत्ताधारी पक्षांत
सत्तास्पर्धा टोकाला पोहोचली होती.
मोरारजी देसाई, कामराज, यशवंतराव चव्हाण
यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांत एकमत न होऊ
शकल्यामुळे तडजोड म्हणून इंदिराजींनी २४
जानेवारी, १९६६ ला पंतप्रधानपदाची
पहिल्यांदा शपथ घेतली. त्यांनी पंतप्रधानदाचे
दुसरे दावेदार मोरारजी देसाई यांचा १५५
मतांनी पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर
त्यांची पुढची वाटचाल खडतर होती.
गुजरातचे लाल आणि माजी पंतप्रधान
मोरारजी देसाई यांच्यावर मात करत इंदिरा
गांधी या पहिल्या महिला पंतप्रधानपदी
विराजमान झाल्या होत्या. इंदिरा
गांधींना पंतप्रधानपदासाठी देशातील 16
पैकी 11 राज्यांनी समर्थन जाहीर केले होते.
या राज्यातील नेत्यांनी एकत्र येवून इंदिरा
गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी पूर्ण
बहूमतही दिले होते.
उल्लेखनीय म्हणजे इंदिरा गांधी यांची लढत
कॉंग्रेसचेच गुलजारीलाल नंदा आणि मोरारजी
देसाई यांच्याशी होती. परंतु तत्कालीन
पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या
अकस्मात निधनानंतर प्रभारी पंतप्रधान बनलेले
गुलजारी लाल नंदा यांनी पंतप्रधान पदाच्या
शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे इंदिरा
गांधी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा
झाला होता.
इंदिरा गांधी आणि गुजराती नेता मोराजी
देसाई यांच्यात सरळ लढत झाली होती. या
काळात मोरारजी देसाई यांनी माघार
घ्यावी, यासाठी त्यांच्यावर
मोठ्याप्रमाणात दबाब आणण्याचा प्रयत्न
झाला. परंतु ते थोडेही डगमगले नव्हते.
पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत
मोरारजी देसाई यांना कॉंग्रेसच्या 525
खासदारांपैकी 100 पेक्षाही कमी
खासदारांचे समर्थन मिळेल असे बोलले जात होते.
मात्र घडले ते फारच वेगळे होते. मोरारजी देसाई
यांना त्या काळी 169 खासदारांनी
पाठिंबा दिला होता. परंतू पंतप्रधानपदासाठ
ी हा पाठिंबा कमीच पडणारा होता. अशा
प्रकारे इंदिरा गांधी 19 जानेवारी 1966 मध्ये
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
बनल्या होत्या. इंदिरा गांधी यांची निवड
कशी झाली हे तर मोराजी देसाई यांनाही
कळले होते. तरी देखील त्यांनी इंदिरा
गांधींना शुभेच्छा दिल्या होत्या.
सरकारची जनकल्याणाची धोरणे यशस्वीपणे
राबवण्यासाठी बॆंकांचे राष्ट्रीयकरण
करण्याच्या प्रस्ताव ठेवला त्याच्या
विरोधात अनेक उद्योग घराणी होती त्यामुळेच
इंदिराजींच्याच मंत्रिमंडळातील उपपंतप्रधान
आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई हे देखील
विरोधात होते.मात्र सर्वसामान्य जनमत या
प्रस्तावाच्या बाजूने होते. पक्षांतर्गत विरोध
डावलून तसेच मोरारजी देसाई यांना बडतर्फ करून
१९६९ मध्ये त्यांनी राष्ट्रीयकरणाचा प्रस्ताव
पुढे रेटला. त्याच वर्षी राष्ट्रपतीपदाच्या
निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या अधिकृत
उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्या विरुध्द
वि.वि गिरी यांना निवडून आणतांना आणि
राजकीय कौशल्याचा प्रताप पक्षांतर्गत
विरोधकांना दाखवला.
१९६९ मध्ये कॉंग्रेस पक्षात फूट पडली श्रीमती
गांधींना पक्षातून काढून टाकण्यात आले मात्र
त्यांच्या बरोबर आलेले पक्षातील खासदार,
कम्युनिस्ट आणि इतर डाव्या पक्षांच्या मदतीने
पंतप्रधानपद कायम राखण्यात इंदिराजी
यशस्वी ठरल्या.मात्र या सर्व घडामोडीत १९७०
मध्ये त्यांचे सरकार अल्पमतात आले आणि १९७१
मध्ये नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी
मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या.यावेळी
इंदिराजीच्या 'गरीबी हटावो' या घोषणेला
देशभरातून प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रचंड
बहुमताने निवडून आल्या.
तत्कालीन पूर्व पाकिस्तावर पाकिस्तानी
सैन्याने अत्याचार सुरु केले पूर्व पाकिस्तानात
मोठा अंतर्गत कलह सूरु झाला याचा परिपाक
म्हणून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात
दाखल झाले हा निर्वासितांचा लोंढा
रोखण्यासाठी अखेर पाकिस्तानावीरुध्द
लष्करी कारवाई करण्यात आली तत्कालीन
अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी
भारताला सज्जड दम देऊन देखील राजकिय
मुत्सद्देगिरीची अपूर्व प्रचिती देत
पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. ९३,०००
पाकिस्तानी सैनिक युध्दकैदी बनले. जगाच्या
नकाशावर बांग्लादेशचा उदय झाला.
स्वत:च्याच पक्षतील जुने नेते 'गुंगी गुडिया' असे
जिचे वर्णन करीत होते त्याच इंदिराजींचे
राजकीय विरोधकही 'रणचंडिका दुर्गा' असे
गुणगान करू लागले.
१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरु करण्यात
आलेल्या हरीतक्रांतीच्या योजनेमुळे १९७० च्या
दशकात भारत अन्न टंचाईवर मात करू लागला.
अन्नधान्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या
मदतीवर अवलंबून राहणे श्रीमती गांधींना
अपमानास्पद वाटत होते. नियोजित शास्त्रीय
पद्धतीने शेत मालाच्या उत्पादनात अमूलाग्र
बदल घडवून आणण्यात आणि त्याक्षेत्रात
भारताला केवळ पूर्णत: स्वयंपूर्णच न होता
अन्नधान्याची निर्यात करण्यापर्यंत
भारताची प्रगती करण्यात यश आले.
श्वेतक्रांतीमुळे असाच बदल दूध आणि दुग्धजन्य
पदार्थात घडून आला. यासर्वाचे दूरगामी अनुकूल
असे परीणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाले.
भारताचा कुरापतखोर शेजारी चीनने १९६४ मध्ये
आण्विक स्फोटाच्या यशस्वी चाचण्या
घेतल्यानंतर भारतालाही त्या क्षेत्रात पदार्पण
करणे आवश्यक झाले होते. त्यामुळेच १९७४मध्ये
राजस्थानच्या वाळवंटात पोखरण येथे
'स्माईलिंग बुध्द' अर्थात आण्विक स्फोटाच्या
यशस्वी चाचण्या स्वबळावर घेऊन भारताला
लष्करी दृष्टीने सामर्थ्यशाली बनवण्यात
यशस्वी झाल्यामुळे संरक्षण क्षेत्रात भारत
बलवान झाला. १९४७ मध्ये स्वातंत्र्य प्राप्त
झाल्यानंतर सत्तावीस वर्षात चार मोठ्या
युद्धांना सामो-या गेलेल्या भारताला पुढील
काळात कारगीलच्या छुप्या मर्यादीत
युध्दाचा अपवाद वगळता अणुस्फोटानंतर युद्ध
करावे लागले नाही ही वस्तुस्थिती आहे.
स्वातंत्रोत्तर काळात भारताच्या इतिहासाचे
हे सोनेरी पान आहे यात शंका नाही.
प्रशाकीय सुसूत्रता आणण्याच्या
दृष्टीकोनातून १९७२ मध्ये इंदिराजींनी मेघालय,
त्रिपुरा आणि मणिपूर यांना राज्यांचा दर्जा
दिला. उत्तर पूर्व सिमांत भागाला
केंद्र्शासित प्रदेश करून त्याला अरुणाचल प्रदेश हे
नांव दिले. १९७५ मध्ये सिक्कीमला भारतात
समाविष्ट करण्यात आले. या राज्यांना
देशाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याचे आणि
उत्तम प्रशासकीय व्यवस्था देण्याचे उद्दिष्ट्य
साध्य झाल्याचे भविष्यात दिसून आले. १९६६
मध्ये अकाली दलाची भाषावार प्रांत रचनेची
मागणी मान्य करून पंजाबी भाषा बोलणा-
यांचा पंजाब, त्यातून हिंदी भाषा बोलणा-
यांचा हरयाणा, पहाडी भाषा बोलणा-
यासाठी हिमाचल प्रदेश या वेगळ्या
राज्यांची निर्मिती केली. १९७५ मध्ये जम्मू
काश्मीरला विशेष घटनात्मक दर्जा देऊन तेथील
फुटीरवाद नियंत्रणात आणला म्हणूनच त्यांच्या
कार्यकालात काश्मीर ब-याच प्रमाणात शांत
राहिला.
इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणामुळे
भारताला जगात मानाचे स्थान मिळाले. १९७१
च्या पाकिस्तान युद्धात अंतरराष्ट्रीय दबाव
झुगारून आमच्या देशहिताचे निर्णय आम्हीच
घेणार असा ठाम संदेश जगाला दिला. अण्विक
चाचण्या घेतांना अण्विक चाचण्या विरोधी
करारावर हस्ताक्षर न करण्याचा निर्धार
कायम ठेवला परंतु त्याचवेळी भारताचा
अणुशक्ती कार्यक्रम शांततापूर्ण आणि विकास
कार्यक्रमांसाठी राबवला जाईल याची
ग्वाही दिली आणि या धोरणाचे कसोशीने
पालन केले. त्यांची संपूर्ण कारकीर्द
शीतयुध्दाच्या काळात साकारली होती.
पाकिस्तान चीन यांच्या बाजूला अमेरिकेचे
झुकते माप पाहून रशिया (तत्कालीन
यू.एस.एस.आर.) बरोबर दीर्घकालीन मैत्रीचा
करार केला त्यामुळे भारताला मोठ्या
प्रमाणात शस्त्रास्त्रे विकत घेता आली आणि
लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढले.
त्यांच्या स्थीर आणि प्रामाणिक परराष्ट्र
धोरणामुळे भारताला मध्यपूर्वेत चांगले मित्र
मिळाले. बांग्लादेशच्या निर्मितीतच
भारताचा सहभाग असल्याने इंदिराजींच्या
कार्यकाळात भारता बरोबर सलोख्याचे संबंध
राखून होता. नेपाळ, भूतान सारख्या लहान
राष्ट्रांसाठी भारत नेहमीच विसंबून रहावा
असा मित्र राहिला. "आसियान" या
आशिया पॆसिफिक गटाच्या स्थापनेमध्ये
त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
१९७५ पासून १९८० पर्यंतचा काळ हा इंदिरा
गांधींच्या आयुष्यातील खडतर काळ होता.
त्याविषयी नंतर उहापोह करूयात.
१९७७च्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत
मानहानीकारक पराभव झाल्यानंतर
'इंदिरायुगाचा अस्त' अशी समजूत करून घेणा-
यांना पूर्णत: चुकीचे ठरवत १९८० च्या लोकसभा
निवडणुकीत दिमाखदार विजय संपादन करून पुन:
पंतप्रधानपद मिळवले. मात्र आता परीस्थिती
बदलली होती. खलीस्तानवादी शीख
अतिरेक्यांनी देशभरात थैमान घातले होते.
यांचा नेता होता जर्नेलसिंग भिद्रानवाले.
खरेतर हे भूत इंदिरा गांधींच्याच राजकारणाचे
फलीत होते. १९७७ च्या निवडणुकीत अकाली
दलाने चांगले यश मिळवल्यानंतर त्या पक्षाला
नामोहरम करण्यासाठी पारंपारीक धार्मिक
नेता जर्नेल सिंग भिंद्रनवालेच्या 'दमदमी
टाकसाळ' ला मदत करून अकाली दलात फूट
पाडण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे जाऊन याच
नेत्याने संत निरंकारी मिशनच्या मदतीने
हिंसाचार सुरु केला. एका कॉंग्रेस नेत्याच्या
हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर भिंद्रानवालेने
स्वत:ला कॉंग्रेस पासून दूर केले आणि अकाली
दलाशी हातमिळवणी केली. पुढे याच गटाने
स्वतंत्र शीख राष्ट्राच्या मागणीसासाठी
मोठ्या प्रमाणात अतिरेकी कारवाया सुरु
केल्या. १९८३ पासून भिंद्रानवालेच्या याच
फुटीरवादी गटाने आपल्या कारवायांच्या
खलिस्तान चळवळीचे मुख्य केंद्र शीखांसाठी
अत्यंत पवित्र अशा सुवर्ण मंदिरात केले.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात विध्वंसक
शस्रास्त्रांचा साठा केला. येथील कारवाया
थांबवण्यासाठी आणि तेथील शस्त्रे
हलवण्यासंबंधी अवाहन करुनही
खालीस्तांवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर
सुवर्णमंदिरावर निर्णायक लष्करी
कारवाईसाठी तयार होण्याचे आदेश इंदिरा
गांधी यांनी दिले. मात्र तत्कालीन लष्कर
प्रमुख एस. के. सिन्हा यांनी अशा प्रकारे
कारवाई करू नये असा सल्ला दिला. त्यामुळे
तडकाफडकी त्यांना या पदावरून हटवून त्यांच्या
जागी ले. जन. अरुण श्रीधर वैद्य यांची नेमणूक करून
ही कारवाई भिद्रनावले मारला गेला.
त्याच्या बरोबरच ८३ लष्करी अधिकारी, ४५०
च्या आसपास सामान्य नागरीकही या
कारवाईत मारले गेले. सुवर्ण मंदिर अतिरेक्यांच्या
तावडीतून मुक्त करण्यात आले मात्र शीख
समाजाच्या मनावर अतिशय खोलवर जखम करून
गेलेली ही कारवाई त्यावेळी अत्यंत आवश्यक
होती. अप्रिय असली तरी इंदिरा गांधी
यांनी अत्यंत कणखरपणे पार पाडली. याची
मोठी किंमत चारच महिन्यात त्यांना आपल्या
प्राणाची आहुती देऊन मोजावी लागली.
१९८२ मध्ये नवव्या आशियाई क्रीडास्पर्धेचे भव्य
आणि नेत्रदीपक यशस्वी आयोजन करून या
क्षेत्रातील भारताच्या ताकदीची जाणीव
बाह्य जगाला करून दिली. या स्पर्धेच्या
काळात भारतीय दुरचित्रवाणीच्य
ा कार्यक्षेत्रात भरीव वाढ झाली.
दूरचित्रवाणीचे रंगीत प्रक्षेपण सुरु झाले.
चार फेब्रुवारी, १९८४ ला लंडनच्या भारतीय
दूतावासातील अधिकारी रविंद्र म्हात्रे यांचे
काश्मिर लिबरेशन फ्रंटच्या अतिरेक्यांनी अपहरण
केले. त्या गटाचा संस्थापक सदस्य मकबूल भट्टची
सुटका करण्याची मुख्य मागणी म्हात्रेंच्या
अपहरणकर्यांनी ठेवली होती. भट्टला भारतीय
न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली
होती आणि त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे
निर्णयासाठी प्रलंबीत होता. तत्कालीन
पंतप्रधान इंदिरा गांधींनी मागणी स्पष्ट
शब्दात फेटाळल्यानंतर ६ फेब्रुवारीला
अतिरेक्यांनी म्हात्रे यांची हत्या केली.
त्यानंतर पाचच दिवसात आवश्यक ती कायदेशीर
कारवाई पूर्ण करून ११ फेब्रुवारीला मकबूल भट्ट्ला
फाशी देण्यात आले. या सर्व घटनाक्रमात
इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून असणारा
कणखरपणा दिसून आला .
इंदिरा गांधीच्या कार्यकाळाचा आतापर्यंत
आढावा घेतांना असे सहज लक्षात येईल की याच
काळात देशाने ख-या अर्थाने स्थित्यंतर अनुभवले.
त्यांनी सूत्रे घेतली तेव्हा भारत स्वतंत्र होऊन
दोन दशकांचा काळही उलटला नव्हता. पं.
नेहरूंची कारकीर्द योजना तयार करणे, पायाभूत
सुविधांची निर्मिती करणे अशा प्रशाकीय
कामात खर्ची पडली. १९६४ पर्यंत अशा प्रकारे
पायाभरणीचे काम झाले होते.परंतु १९६२ च्या
चीन आणि १९६५ च्या पाकिस्तान युध्दामुळे
अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती.
,'एखादा देश गरीब असतो कारण तो गरीब
असतो', अर्थशास्त्राच्या या जुन्या
नियमाप्रमाणे गरिबीमुळे असणारा
संसाधनांचा तुटवडा त्यामुळे आणखी तीव्र
गरीबी हे दुष्टचक्र भेदणे हे शिवधनुष्य पेलण्याइतपत
अवघड काम इंदिरा गांधींनी सहजी पेलले. देश
उभारणी काही दिवसात किंवा एक दोन
वर्षांत होणारे काम नाही.देश उभारणी म्हणजे
केवळ कारखाने उभारणे आणि उद्योगांचा
विकास असेही नाही. आपण ज्या परीस्थितीत
आहोत त्यात सुधारणाकरुन त्यातून बाहेर
पडण्याची मानसिकता देशवासियांमध्ये
निर्माण करणे हाही देश उभारणीचाच भाग
मानला पाहिजे.त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या
अन्नधान्याच्या मदतीवर अवलंबून राहणे
अपमानास्पद वाटल्यामुळे शेतीच्या तंत्रातच
अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी संशोधकांना
, पारंपारीक पद्धतीने शेती करणा-या शेतक-
यांना ,विपणन व्यवथा करणा-या व्यापा-
यांना प्रेरीत करणे एवढे सहज सोपे नव्हते
'हरितक्रांती' सारख्या महत्वाकांक्षी
योजनेद्वारे काही वर्षांतच संपूर्ण कायापालट
होऊन अन्नधान्याच्या उत्पादनात गरुडझेप घेऊन
अन्नधान्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून
असणारा देश ते अन्नधान्याची मोठ्या
प्रमाणात निर्यात करणारे राष्ट्र असा प्रवास
ही मानसिकता सर्व संबंधीतांमध्ये निर्माण
करण्यामुळे झाला.
पंतप्रधान या नात्याने त्यांनी तीन
पंचवार्षिक योजनांचे नेतृत्व केले.निश्चित केलेली
उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कठोर
परिश्रमाला पर्याय नाही हे त्यांनी आचरणात
आणून दाखवले. आणीबाणीच्या पार्श्भूमीवर
आलेली पांचवी पंचावार्षिक योजना वीस
कलमी कार्यक्रमामुळे गाजली. या
कार्यक्रमावर अतोनात टीका झाली तरी
नियोजित लक्ष्य साध्य करण्याचे प्रयत्न या
योजनेत सर्वाधिक जोमाने करण्यात आले.
आतापर्यंत इंदिरा गांधी यांच्या जमेच्या बाजू
पाहिल्या. जवळपास १६ वर्षांची
पंतप्रधानपदाची कारकीर्द उपभोगलेल्या
त्यांच्या सारख्या वादळी नेतृत्वाला वाद
विवादांना तोंड द्यावे लागले असल्यास
आश्चर्य नाही. त्यातच सत्ता हाती
ठेवण्यासाठी आणि मतपेटीच्या राजकारणात
जे हातखंडे इतर राजकारणी वापरतात ते
इंदिराजींनीही वापरले कदाचित काही वेळा
अतिरेकी प्रमाणात .सत्ता हाती
ठेवण्यासाठी मुस्लीम एकगठ्ठा मतांसाठी
शाही ईमामांपुढे लोटांगण घालून त्यांच्या
अटी मान्य करणे, आपल्या पक्षात आणि सरकार
चालवतांना बहुमताच्या जोरावर हुकुमशाही
पध्दतीने कारभार करणे केंद्र-राज्य संबंधातील
समतोल बिघडवणे , आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री
फारसे बलवान होणार नाहीत याची काळजी
घेत त्यांना सतत अस्थिरतेच्या वातावरणात
ठेवणे, संसदेत ज्या प्रस्तावावर विरोध
होण्याची शक्यता आहे असे प्रस्ताव संसदेत न
आणता राष्ट्रपतींमार्फत वटहुकूम काढून त्यांची
अमलबजावणी करणे. थोडक्यात राजकारणात
नितीमत्ता न पाळणे अशाप्रकारचे हे आरोप
गंभीर होतेच मात्र त्यांच्या कारकीर्दीवर न
पुसला जाणारा डाग लागला तो जून १९७५ मध्ये
स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक
तरतुदींचा गैरवापर करून देशात आणिबाणी
जाहीर केली १९७१ मध्ये त्यांच्या विरोधात
रायबरेलीतून निवडणूक लढवणा-या राजनारायण
यांनी दाखल केलेल्या खटल्यावर निर्णय १९७५
मध्ये निर्णय देताना अलाहाबाद उच्च
न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन सिन्हा
यांनी निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर
केल्याचे ग्राह्य धरून दोषी ठरवले त्यांची
निवडणूक अवैध ठरवत निर्वाचित उमेदवार म्हणून
कोणतेही अधिकाराचे पद स्विकारण्यास सहा
वर्षांसाठी मनाई केली. त्यांच्या पक्षाला
पुढील वीस दिवसांत नवीन पंतप्रधानची निवड
करण्याचे आदेश दिले. या निर्णयावरून देशभरात
आंदोलने सुरु झाली. न्यायालचा आदेश मान्य
करून पद सोडण्यास नकार देऊन देशात
आणीबाणीची घोषणा केली. घटनेतील ही
तरतूद आपल्या राजकीय स्वार्थासाठी
वापरल्यामुळे देशभरात असंतोष पसरला.
विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून तुरुंगात
डांबण्यात आले. घटनेने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्
राचा अतोनात प्रमाणात संकोच झाला.
त्यानंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत
पक्षाचे भूतो न भवती अशाप्रकारचे नुकसान
झाले. त्या स्वत:ही या निवडणूकीत पराभूत
झाल्या.
ऑपरेशन ब्लू स्टार हे कोणत्याही
सत्ताधिशासाठी आव्हान होते. राजकीय
दृष्टीने अंगलट येऊ शकणारा निर्णय केवळ
देशहितासाठी घेतला आजही शीख समाज
त्यासाठी इंदिराजींना माफ करीत नाही
त्यांच्यासाठी हा भावनात्मक मुद्दा आहे. पण
ज्या प्रमाणात संहारक शस्त्रास्त्रांचा साठा
सुवर्ण मंदिरात केले गेला होता आणि त्याचा
वापर अतिरेकी कारवायांसाठी केला जात
होता. त्यामुळे ही कारवाई आवश्यक बनली
होती.
१९६६ ते १९८४ या काळात अन्नधान्य, अर्थकारण,
संरक्षण, परराष्ट्र संबंध, अवकाश संशोधन, प्रशासन
या सर्वच क्षेत्रात भारताचा एक देश म्हणून
सर्वांगीण विकास झाला. भारताला आपली
स्वत:ची ओळख मिळाली. व्यक्तिगत आयुष्यात
अनेक उतार चढावांचा अनुभव घेतलेल्या
इंदिराजींनी पंतप्रधान या नात्याने देशाला
मात्र एक कणखर आणि सशक्त नेतृत्व दिले. बाह्य
शक्तींना आपल्या देशाच्या अंतर्गत घडामोडीत
लुडबूड करू दिली नाही. १९७१चे युध्द, अण्विक
चाचण्या, रशियाशी जवळिक आशा प्रसंगी
आलेले दडपण सहजी झुकारून दिले.
देश उभारणी म्हणजे यापेक्षा काही वेगळे असते ??

संदर्भ - मायबोली, दै दिव्य मराठी .

सौजन्य - गुरुवर्य ग्रुप, कवठेमहांकाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा