सांगली जिल्हा

                                          सांगली जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली
क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव,
जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव.
सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व
वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील
विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस
व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर
पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.
जिल्हा विशेष -
1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून
उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे
निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून
दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात
करण्यात आले.
सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात.
हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला
या जिल्ह्यात 'शाळू' म्हणून ओळखले जाते.
प्रमुख स्थळे
सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून
येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे.
मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा
दर्गा प्रसिद्ध आहे.
औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह
सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण
कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण
महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर
भवनेश्वरीचे मंदीर आहे.
बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या
सुमारास किल्ला बांधला.
बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव
अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला
असून तो शिवाजीच्या ताब्यात होता.
भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत
यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे.
देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय
यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक
प्राचीन लेण्या आहे.
कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू
मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे.
कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या
आहे.
शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील
लोक नागपंचमीसाठी येथे येतात.
मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा
किल्ला बांधला.

     www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा