जालना जिल्हा

                                            =======Ⓜ🅰🅿========
                                            📚संकलन ~📌 धर्मेंद्र मेश्राम
                                             =======Ⓜ🅰🅿========
                           
                                                     🌕जालना जिल्हा🌕
                                                      ❇राज्य महाराष्ट्र
                                          ❇विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
                                                      ❇मुख्यालय जालना
 ❇तालुके

◾जालना
◾अंबड
◾भोकरदन
◾बदनापूर
◾घणसवंगी
◾परतूर
◾मंठा
◾जाफराबाद
✴क्षेत्रफळ ७,६१२ चौरस किमी (२,९३९ चौ. मैल)
✴लोकसंख्या १९,५८,४६३ (२०११)
✴लोकसंख्या घनता २५७ प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
✴साक्षरता दर ७३.६१
✴लिंग गुणोत्तर १.०७ ♂/♀
🌕लोकसभा मतदारसंघ
जालना (लोकसभा मतदारसंघ)
🌕पर्जन्यमान ७६३ मिलीमीटर (३०.० इंच)
🌉जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो.
🌉आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला.
🌉जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.

🌉महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत.
🌉अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो.
🌉जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो.
🌉जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो.
🌾पिके
🌿ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत.
🌿जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे.
🌉जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
⛵राजूर येथील श्री गणेश मंदीर,
⛵अंबड येथील मत्स्योदारी देवी, ⛵जळीचा देव (जयदेववाडी).
⛅हवामान
☀समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामन स्वाभाविकच:च विषम व कोरडे आहे.
☀येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो.एप्रिल- मे महिन्यात तापमान ४१ से च्या पुढे जाते
☀दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्हयातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्हयात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो.
☀त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते.
✴नद्या
🚰गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते.
🚰गोदावरी नदी औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिणा सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो.
🚰गोदावरीने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित करून जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती औरंगाबाद जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमाभागात गोदावरीस मिळते.
🚰औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठयाच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते.
🚰 ही नदी भोकरदन व जाफराबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बूलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यात प्रवेशते,
🚰धामना, जूई, खेळणा, गिरजा, जीवरेखा , या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत.
🚰भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण एक महत्त्वाची नदीकाठी आहे. दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय.
🚰औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पूढे परभणी जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो.
🚰कुंडलिका व कल्याण या दुधनेच्या जिल्ह्यातील प्रमूख उपनद्या होत.
✈वाहतूक व्यवस्था
🚊जालना रेल्वे स्थानक हे येथील रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर स्थित आहे.
🚊जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
🚊मुंबईहून औरंगाबादपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट २०१५ मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली.
🚊ह्याव्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस. नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.
🚌महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नागपूर–औरंगाबाद–मुंबई द्रुतगती मार्ग जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे.
🔔धर्म- अध्यात्म
📢जालना जिल्हा हे महानुभाव पंथाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे.
📢जाळीचा देव , रामसगाव, आहेरमल, पंचाळ॓श्वर, काजळा येथे चक्रधर स्वामींची स्थाने आहेत.
📢घनंसावंगी तालुक्यात समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म गाव जाबं समर्थ हे आहे .
~~~~~~Ⓜ🅰🅿~~~~~~
      🍀🔷🍀🔷🍀🔷🍀
=======Ⓜ🅰🅿========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा