माझा प्रश्नगडी

👭 *शैक्षणिक उपक्रम* ::
*माझा प्रश्नगडी* 👬
*📝 ज्ञानदेव नवसरे,नाशिक*
मुलांची वैचारिक क्षमता विकसित करण्यासाठी, सभाधीटपणा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी , मुलांची जिज्ञासू वृत्ती जाणून घेण्यासाठी मला या उपक्रमाचा खुप फायदा होत आहे .
👉🏻 *कार्यवाही*
या उपक्रमात मुलांनी शिक्षकाला ,
पालकांना, किंवा आपल्यापेक्षा मोठ्या मुलांना स्वतः ला आलेल्या अडचणी,समस्यासंबंधी प्रश्न विचारणे अपेक्षित आहे व त्याची नोंद त्याचा सहकारी प्रश्न गडी वहीत करणार आहे ,त्यामुळे प्रश्न विचारताना आपला प्रश्न गडी सोबत असणे आवश्यक आहे . प्रश्न गडी सोबत नसतानाही विद्यार्थी प्रश्न ,अडचणी, समस्यांवर उपाय एकमेकांना विचारत असतातच पण या उपक्रमामध्ये प्रश्न गडी व सहकारी मित्राच्या प्रश्नांची नोंद यासाठी ठेवायची आहे की जेणेकरून त्यांनी विचारलेल्या ठराविक कालावधीतील प्रश्न संख्येवरून, व स्वरूपावरून आपल्याला विद्यार्थी भाव विश्व, जिज्ञासू वृत्ती आणि विद्यार्थी संबंधित बरेच पैलू सापडतात एकंदरीत मूल समजून घेण्यासाठी खुप फायदा होत असतो.
*हा उपक्रम कसा घेत आहे*
👉🏻विद्यार्थ्यांचे दोन दोनचे गट केले आहेत,दोघे एकमेकांच्या प्रश्नांच्या संख्येची नोंद वहीत करतात.
👉🏻एक आठवडाभर विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि कोणाला विचारला याची नोंद केली जाते .
*उदा.*
शिक्षक :: १०
वडील :: ७
मुख्याध्यापक ::५
जेष्ठ विद्यार्थी :: २०
इतर स्त्रोत :: ५
मुले आठवडाभर त्यांना अभ्यास करताना ,खेळताना ,व्यावहारिक जीवनातील अडचणी, परिसरातील ज्ञान, इत्यादी बाबींवर प्रश्न विचारतात.
👉🏻 आठवडाभर सर्वात जास्त प्रश्न विचारणा-या मुलाचे विशेष कौतुक करत सोमवारी त्याला एक पेन बक्षीस म्हणून दिला जात आहे ,त्यामुळे मुले एकमेकांशी निकोप स्पर्धा करताना दिसत आहेत परिणामी जास्तीतजास्त प्रश्न ही विचारत आहेत.
👉🏻 जे विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत त्या मुलांना प्रलोभन दिले जाते की जेणेकरून त्याचीही जिज्ञासू वृत्ती वाढीस लागावी.
👉🏻 प्रश्न कसे उपस्थित केले जातात, प्रश्न निर्मिती कशी केली जाते, कोणते प्रश्न या उपक्रमात ग्राह्य धरले जातील यासंबंधी सूचना आणि दिशादर्शन माझी प्रश्नपेढी या उपक्रमाच्या वेळी मुलांना दिलेल्या आहेत ,त्यामुळे मुले योग्य ते प्रश्न विचारत आहेत.
सध्यातरी अभ्यासातील अडचणीसंबंधी मुले जास्त प्रश्न विचारताना दिसत आहेत.
👉🏻 व्यावहारिक ज्ञान, परिसरातील प्रश्न ही मुले विचारत आहेत आणि आपल्या सभोवताली असणारा परिसर समजून घेत आहेत.
👉🏻👉🏻 या उपक्रमाचा फायदा म्हणजे विद्यार्थी आणखी जवळ येऊ लागला आहे .
स्वतः ला समृद्ध करू लागला आहे .
विद्यार्थी समजून घेण्यासाठी या उपक्रमाचा खुप फायदा होत आहे .
धन्यवाद 🙏🏻🙏🏻                                                                                                                                             ज्ञानदेव नवसरे,नाशिक                                                                                                                                                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा