रायगड

                                              रायगड

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अलिबाग
क्षेत्रफळ - 7,152 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 26,35,394 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - कर्जत, पनवेल, उरण, मुरुड, पेण, रोहा, खालापूर,
सुधागड, अलिबाग, माणगाव, म्हसाळे, श्रीवर्धन, महाड,
पोलादपूर, तळा.
सीमा - उत्तरेस ठाणे जिल्हा , पश्चिमेस अरबी समुद्र,
दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला
लागून पुणे जिल्हा आहे. आग्नेयेस सातारा जिल्हा.
जिल्हा विशेष -
पूर्वीचे नाव कुलाबा. या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी
महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला असल्याने या
जिल्ह्याचे रहिवासी असलेले महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री
बॅ.ए.आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत कुलाबा जिल्हयांचे
नामकरण 1 जानेवारी 1981 रोजी रायगड असे करण्यात
आले.
शिवरायांचा उजवा हात म्हणून ज्यांची ओळख आहे ते
तानाजी मालुसरे याच जिल्ह्यातील उमरठ गावचे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विधापीठाची स्थापना
याच जिल्हयात लोणेर येथे करण्यात आली.
प्रमुख स्थळे
किल्ले - शिवरायांची समाधी व राजधानी असलेला
प्रसिद्ध किल्ला रायगड येथेच आहे. कर्नाळा किल्ला,
पाली किल्ला, मढ किल्ला हे प्रसिद्ध शिवकालीन
किल्ले याच जिल्ह्यात आहेत.
गागोदे - आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान पेण
तालुक्यात आहे.
खांदेरी किल्ला - जवळच चोला येथे बोद्धकालीन लेणी
आहे.
अलिबाग - रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून
ओळखल्या जाते. हे समुद्रकिनारी आहे. कान्होजी आंग्रे
यांचे स्मारक.
हिराकोट - हा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.
शिरढोण - आध क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे
जन्मगाव.
महाड - चवदार तळ्याच्या सत्याग्रह येथेच झाला.
मुरुड-जंजिरा - अभेध असा जलदुर्ग.
माथेरान - थंड हवेचे ठिकाण.
घरापुरी - मुंबईपासून जवळ असलेल्या येथील 'एलिफंटा
कव्हेज' रायगड जिल्ह्यात आहेत.
भिवपुरी जलविधुत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे.
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नांव कुलाबा हे होते.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे.
तकाई हे धार्मिक स्थळ रायगड या जिल्ह्यात आहे.
घारापुरी लेणी (एलिफंटा) रायगड जिल्ह्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा