बुलढाणा जिल्हा

                                      बुलढाणा जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - बुलढाणा
क्षेत्रफळ - 9,661 चौ. कि.मी.
लोकसंख्या - 25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 13 - जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा,
खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा,
सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.
सीमा - बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश,
दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस
अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे
दोन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष -
प्राचीन 'कुंतल' देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट
अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता.
भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे 'भिल्लठाणा' या शब्दाचा
अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने
नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे
प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात
लोणार हे ठिकाण खार्या पाण्याच्या सरोवरासाठी
जगभर प्रसिद्ध आहे.
प्रमुख स्थळे
बुलढाणा - हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून
थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
खामगाव - येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच
गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.
मलकापुर - येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.
देऊळगाव राजा - देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर
प्रसिद्ध आहे.
शेगांव - येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
सिंदखेड-राजा - छत्रपती शिवाजी महाराजाच्या
मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान
जामोद - जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.
लोणार - उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या
शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात
लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या
राक्षसाची कथा या महात्म्यात येते.
राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा,
बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.
बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड,
यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी
मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव
(ब्रोंडगेज), 46 कि.मी.

     www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा