गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्हा


=====================
   ��महाराष्ट्र एडमिन पैनल��
__________________________
         ��गोंदिया जिल्हा��
☀गोंदिया जिल्‍हा हा भंडारा जिल्‍हयाचे विभाजन करुन निर्माण करण्‍यात आला.
☀गोंदिया जिल्‍हा महाराष्ट्र राज्‍याच्‍या उत्‍तर पुर्वेस असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ राज्य ज्यांच्‍या सीमेला लागून आहे.
☀जिल्‍हयाची एकूण लोकसंख्या 1322331 आहे.
पुरुष संख्‍या 662509 आणि स्‍त्री संख्‍या 659807 आहे.
जिल्‍हयात अनुसूचित जाति लोकसंख्‍या 355484 आणि अनुसूचित जमात लोकसंख्या 309822 आहे.
☀जिल्‍हयाचा साक्षरता दर 76.61% आहे.
☀हा जिल्‍हा अविकसीत असून येथील बराच भूभाग हा जंगलाने व्‍याप्‍त आहे.
��पिके
धान येथील मुख्‍य उत्‍पन्‍न आहे. गहू, तुर, चना, हळद, जवस सुध्‍दा येथे पिकविला जातो. येथील लोकांचा मुख्‍य व्‍यवसाय शेती आहे.
��उद्योग
जिल्‍हयात मोठया उद्योगांमध्‍ये अदानी समूहाचा अदानी पावर लिमीटेड तिरोडा येथे सुरु झाला आहे. छोटया उ्द्योगांमध्‍ये ब-याच संख्‍येने राईस मिल आहेत. धान येथील मुख्‍य कृषी उत्‍पादन असल्‍यामुळे गोंदिया जिल्‍हा धानाचा जिल्‍हा म्‍हणून प्रसिष्‍द आहे.
��जिल्‍हयात गोदिया, तिरोडा आणि देवरी असे 3 उपविभाग आहेत. गोदिया उपविभागात 2 तालुके
असून , तिरोडा उपविभागात 2 तालुके असून ,देवरी उपविभागात 4 तालुके असून 556 ग्रामपंचायती 954 गावे आहेत.
��विधानसभा
जिल्‍हयात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाँव असे 4 विधानसभा निर्वाचन आहेत.
⛵जिल्‍हयात 8 तालुके व 8 पंचायत समित्‍या आहेत
गोंदिया व तिरोडा या दोन नगरपरिषदा आहेत
��नद्या
वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी जिल्‍हयातून वाहते.
बाघ, चुलबंद, गाढवी आणि बावनथडी हया तिच्‍या उपनद्या आहेत
��पर्यटनस्थळे:
नागझिरा वने,
प्रतापगड किल्ला,
इतियाडोह धरण,
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
��जिल्ह्या्तील तालुके
अर्जुनी/मोरगाव, आमगाव, सडक/अर्जुनी, सालेकसा, गोंदिया तालुका, गोरेगाव तालुका, तिरोडा व देवरी
��विशेष
��गोंदिया जिल्हा १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झाला.
��गोंदियाचेही ‘तलावांचा जिल्हा’ हे वैशिष्ट्य कायम राहिले आहे.
��प्राचीन, सुप्रसिद्ध नाटककार भवभूतीची ही भूमी!
��गोंड, हळवी आदी जमातींचा निवास, घनदाट जंगले, समृद्ध खनिज संपत्ती ही गोंदिया जिल्ह्याची मुख्य वैशिष्ट्ये.
��गोंदिया तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
��अभयारण्य
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य (नवेगाव राष्ट्रीय उद्यान)
नागझिरा अभयारण्य यांसह गोंदिया पर्यटनातही प्रगती करत आहे.
��भूगोल
��भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा महाराष्ट्राला मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) व छत्तीसगड (राजनंदनगाव जिल्हा) या राज्यांना जोडतो.
��गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याचा प्रदेश आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे आहेत.
��डोंगराळ प्रदेश, विषम हवामान, विविध प्रकारची जमीन (माती), अनेक नद्यांनी व जैवविविधतेने समृद्ध असणारा हा गोंदिया जिल्हा आपणास निसर्गाची अनेक रूपे दाखवितो.
��सिंचन
����जिल्ह्यात नवेगाव बांध हा जिल्ह्यातील तलावांपैकी सर्वाधिक मोठा तलाव आहे.
���� माजागड, रेंगोपार, चूलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच जलसिंचनाचेही कार्य साधतात.
✴धरणे
��अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील, गाढवी नदीवरील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प (धरण) आहे. याची क्षमता सुमारे ३१८ क्यु. मी. आहे.
��जिल्ह्यात शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगढ, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.
➿खनिज संपत्ती
खनिज संपत्तिच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनेडियम ही खनिजे सापडतात.
��दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे जास्त असलेले प्रमाण हीदेखील एक लक्षणीय बाब आहे.
�� संकलन~✏धर्मेंद्र मेश्राम
=====================
     ☀��☀��☀��☀
=====================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा