चाफेकर बंधू


            💡चाफेकर बंधू💡
⭐वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.
⭐वासुदेव चापेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.
⭐कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे.
⭐बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.
⚡वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला.
⚡त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.
⚡पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले.
⚡ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता.
⚡भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती.
⚡या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले.
⚡याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले.
⚡रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली.
⚡हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला.
💥यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.
💥रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला.
💥त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता.
💥सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
💥दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडचेवर जवळून गोळ्या झाडल्या.
💥रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.
💥याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.
💥चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले.
💥दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले.
💥त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९

💥बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले,
💥व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.
📽आधारित चित्रपट
🎞चापेकर बंधूंवर आणि रँडच्या खुनाच्या घटनेवर '२२ जून १८९७' हा मराठी चित्रपट निघाला.
📌नोट
🚩सर्वसामान्यपणे चापेकर असा उल्लेख चुकीचा होत असला तरी या क्रांतिकारक बंधूंचे आडनाव 'चाफेकर' असे होते.
========================
   🔩संकलन - 🎌धर्मेंद्र मेश्राम🎌
========================
        💥⭐💥⭐💥⭐💥
========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा