मुंबई शहर

                                               मुंबई शहर
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - मुंबई
क्षेत्रफळ - 157 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 31,45,966 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - नाहीत.
सीमा - उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण-पूर्व या भागात
अरबी समुद्र.
जिल्हा विशेष -
1990 मध्ये बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई
उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने
सर्वात लहान असलेला जिल्हा म्हणून मुंबई शहराची ओळख
आहे. मुंबई हे भारताचे प्रवेशव्दार समजले जाते. 1857 मध्ये मुंबई
विधापीठाची स्थापना झाली आणि मुंबई व
महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया रोवला गेला.
महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावलौकिक.
महाराष्ट्रची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी,
प्रथम क्रमांकाचे औधोगिक शहर .
1877 मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखेबाजार स्थापना
करण्यात आला असून हा भारतातील पहिला व सुसंघटित
रोखेबाजार मानला जातो.
प्रमुख स्थळे
दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी .
गेट वे ऑफ इंडिया - प्रेक्षणिय स्थळ (1911 मध्ये राजा
पाचवा जार्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी
भारताचे प्रवेशव्दार बांधण्यात आले.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा