रवींद्रनाथ टागोर


        📓रवींद्रनाथ टागोर📓
📔टोपणनाव - गुरुदेव
📔जन्म - मे ७, १८६१ कोलकाता, भारत
📔मृत्यू - ऑगस्ट ७, १९४१
कोलकाता, भारत
📔कार्यक्षेत्र - साहित्य, संगीत,
तत्त्वज्ञान, नाटक
📔साहित्य प्रकार - कविता, नाटक
📔प्रसिद्ध साहित्यकृती - जन गण मन, गीतांजली
📔वडील - देबेंद्रनाथ टागोर
📔आई - सरला देवी
📔पत्नी - मृणालिनी देवी
🏅पुरस्कार - साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)
☮रवींद्रनाथ ठाकूर  ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते.
☮१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला.
☮रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.
㊗कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.
㊗वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या.
㊗शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय.
㊗रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.
㊗दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.
㊗पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
📓जीवनपट
☯कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनावः रवि) यांचा जन्म झाला.
☯११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रु. १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली.
☯वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता(इथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी.
☯येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.
☯१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या.
☯विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.
☯बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले.
☯१८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील ठाकूर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली.
☯त्यांची पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.
📚शांतिनिकेतन
🌴१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली.
🌴याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले.
🌴ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.
🌴१९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
☯रविंद्रनाथ आणि महाराष्ट्र
🌸रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता.
🌸संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
🌸कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली 
🌸छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे.
🌸रवीन्द्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्त्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती.
🌸रविन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते.
🌸रवीन्द्रसाहित्य मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले.
🌸मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा.बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.
📚निवडक साहित्य सूची
📕कादंबऱ्या
चोखेर बाली (१९०२)
गोरा (१९१०)
चतुरंग (१९१६)
राजा आर रानी (१९१६)
मुक्तधारा (१९१६)
राज ऋषि (१९१६)
घरे बाईरे (१९१६)
शेषेर कबिता (१९२९)
जोगाजोग (१९३०)
चार अध्याय (१९३४)
📕लघुकथा
काबुलीवाला
दृष्टिदान
क्षिदित पाषाण
📕नृत्य-नाटिका
मालिनी (१८९५)
चित्रांगदा (१९३६)
श्यामा (१९३८)
चंडालिका (१९३८)
📕नाटके
राजा ओ रानी (१८८९)
बिसर्जना (१८९०)
बैकुण्ठेर खाता (१८९७)
📕काव्य व पुस्तके
सोनार तारी (१८९३)
नैबेद्य (१९०१)
गीतांजली (१९१०)
पूरबी (१९२५)
पुनश्च (१९३२)
शेष सप्तक (१९३५)
पत्रपूत (१९३६)
श्यामली (१९३६)
जन्मदिने (१९४१)
🎥चित्रपट
📀रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, देवदास, काबुलीवाला वगैरे वगैरे. मराठीतही दृष्टिदान नामक लघुकथेवर त्याच नावाचा मराठी चित्रपट झाला आहे.
🎹रवींद्रसंगीतातील काही निवडक गीते
🎼आमार शोनार बांग्ला
🎼sound_title = Amar Shonar Bangla (Instrumental)
🎼आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | (( मी तुला ओळखतो ग बिदेशिनी )
🎼(रवींद्रसंगीतातील एक अतिशय लोकप्रिय गीत)
आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी |
🇮🇳जन गण मन
=====================
   📌संकलन - 📎धर्मेन्द्र मेश्राम
=====================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा