. बीड जिल्हा

. बीड जिल्हा 
:
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - बीड
क्षेत्रफळ - 10,693 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 25,85,962 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 11 - गेवराई, आष्टी, माजलगांव, पाटोडा, केज,
अंबाजोगाई, धारूर, परळी, बीड, शिरूळ-कासार, वडवणी.
सीमा - उत्तरेस जालना व औरंगाबाद हे दोन जिल्हे, पूर्वेस
लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस
अहमदनगर जिल्हा, ईशान्येस परभणी जिल्हा असून आग्नेयेस
कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

1 नोव्हेंबर 1956 ला व्दिभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात
आल्यानंतर बीड जिल्हा या राज्याचा एक भाग बनला.
पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात समाविष्ट
करण्यात आला.
बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या
खोर्यात बिळासारख्या किंवा खळग्यासारख्या
ठिकाणी हे शहर बसले असल्याने 'बीळ' या शब्दावरून या
जिल्ह्याचे नाव 'बीड' असे पडले असावे अशी उपपत्ती आहे.
हा ऐतिहासिक जिल्हा आहे. भारतातील प्रसिद्ध
गणितज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच होते. उस
कामगारासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
प्रमुख स्थळे -
बीड - शहरात कंकालेश्वराचे जलमंदिर आहे. शहराजवळ
'खजाना' ही प्रसिद्ध विहीर असून तिचे पाणी कधीच
आटत नाही. येथील औष्णिक विधुत केंद्र राष्ट्रीय
पातळीवरही महत्वाचे गणले जाते.
मांजरशुभा - जवळच 'कपिलधार' नावाचा धबधबा आहे.
राक्षसभुवन - 10 ऑगस्ट 1763 रोजीची पेशवा व निजाम
यांच्यातील निर्णायक युद्धाची जागा येथील शनिमंदिर
प्रसिद्ध आहे.
आष्टी - येथील हजारतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक
भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
आंबेजोगाई- जोगाई व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे,
आधकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या
समाधीसाठी प्रसिद्ध.
परळी - येथील बैजनाथाचे मंदिर प्रसिद्ध असून बारा
ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी असून ती
जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.
बीड येथे चर्मोधोग प्रकल्प मराठवाडा विकास
महामंडळातर्फे राबविण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा