सिंधुदुर्ग

                                             सिंधुदुर्ग

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - ओरोस बुद्रुक
क्षेत्रफळ - 5,207 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 8,48,868 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 8 - कुडाळ, देवगड, सावंतवाडी, कणकवली,
मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, दोडामार्ग.
सीमा - उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र,
दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य, पूर्वेस सह्याद्री
पर्वतरांगेला लागून कोल्हापूर जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 ला
महाराष्ट्र दिनाच्या शुभ माहूर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन
जिल्हा अस्तित्वात आला.
सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन
विधुत प्रकल्प जमसांडे, ता. देवगड येथे उभयारण्यात आला.
प्रमुख स्थळे
किल्ले - विजयदुर्ग किल्ला, पदमदुर्ग, रंगणा, मनोहरगड,
रामगड, यशवंत गड हे या जिल्ह्यातील महत्वाचे किल्ले
आहेत.
कणकवली - भालचंद्र महाराजांचे समाधीस्थान.
अंबोली - निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. अंबोलीपासून
जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत.
कणकेश्वर - यादवकालीन शिवमंदिर
विजयदुर्ग - शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग.
फोंडा - सह्याद्री पर्वतावरचा घाट. फोंडा घाटातील
मध प्रसिद्ध आहे.
देवगड - देवगड तालुक्यातील साळशी गावाजवळ सदानंदगड
हा गिरीदुर्ग किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील
तळेरे गावापासुन 52 कि.मी. वर विजयदुर्ग का किल्ला
आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी तट आहे.
मावळण - मावळण तालुक्यामध्ये रामगड, सिद्धगड,
वेताळगड, भगवंतगड व भरतगड हे गिरीदुर्ग किल्ले आहेत.
पद्मदुर्ग राजकोट व सर्जेकोट हे किनारीदुर्ग किल्ला आहे.
कुडाळ - कुडाळ तालुक्यातील घेटगे गावाजवळ सोनगड
किल्ला, शिवापुर जवळ मनोहर आणि मनसंतोष
किल्ल्यांची जोडी आहे.
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे.
महाराष्ट्रातील पहिला पवन विधुत प्रकल्प जामसांडे,
देवगड (सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली
(747 सें.मी.) सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोस बुद्रुक हे आहे.
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे शहर पूर्वीच्या
संस्थांनाची राजधानी होती.
सिधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात सुंदर राजवाडा व
मोती तलाव आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात दीपगृह निवती येथे
आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले सेंट ल्युकचे हॉस्पिटल आहे.
पावसाच्या स्वामी स्वरुपानंदानी ज्ञानेश्वर मंदिराची
स्थापना वेंगुर्ले येथे केली.
सिधुदुर्ग जिल्ह्यात दुध व्यवसायाचे मुख्य केंद्र कणकवली हे
आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू संशोधन केंद्र वेंगुर्ले हे आहे.
विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग येथे आहे.


                                          www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा