अण्णाभाऊ साठे

       
                                                    🍀अण्णाभाऊ साठे🍀
     
                                      💎तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे
                                      💎जन्म-ऑगस्ट १, इ.स. १९२०
                                      💎मृत्यु- जुलै १८, इ.स. १९६९
⭐मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले
✏लेखन
अण्णा भाऊ साठे यांनी
३५ कादंबर्‍या,
८ पटकथा,
३ नाटके,
एक प्रवासवर्णन,
१३ कथासंग्रह,
१४ लोकनाट्ये,
१० प्रसिद्ध पोवाडे
१२ उपहासात्मक लेख लिहिले.
✏पोवाडे
बंगालचा दुष्काळ,
तेलंगण संग्राम,
पंजाब-दिल्लीचा पोवाडा,
अंमळनेरचे हुतात्मे,
काळ्या बाजाराचा पोवाडा,
’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड,
कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ 
हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा,
बर्लिनचा पोवाडा,
चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले.
🌸जीवन
⭐ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वटेगाव या गावी अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.
⭐अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसर्‍या पत्‍नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली.
वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
⭐कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.
🌸मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली.
त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.
गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती.  त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले.
🎥कादंबरीवर आधारित चित्रपट
१ वैजयंता - वैजयंता
२ आवडी- टिळा लावते मी रक्ताचा
३ माकडीचा माळ-डोंगरची मैना
४ चिखलातील कमळ -मुरली मल्हारी रायाची
५ वारणेचा वाघ-वारनेचा वाघ
६ अलगूज -अशी ही सातार्‍याची तऱ्हा
७ फकिरा - फकिरा
८ चित्रा - चित्रा
📚कादंबर्‍या
१ अग्निदिव्य २ अलगूज
३ अहंकार    ४ आग
५ आघात    ६ आवडी
७ केवड्याचे कणस ८कुरूप
९ गुलाम      १० चंदन
११ चिखलातील कमळ१२चित्रा
१३ जिवंत काडतूस
१४ ठासलेल्या बंदुका
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ तास१७ धुंद रानफुलाचा
१८ पाझर १९ फकिरा
२० फुलपाखरू २१ मंगला
२२ मथुरा  २३ माकडीचा माळ
२४ मास्तर २५ मूर्ती
२६ रत्ना २७ रानगंगा
२८ रानबोका २९ रूपा
३० वारणेचा वाघ
३१ वारणेच्या खोर्‍यात
३२ वैजयंता ३३ वैर
३४ संघर्ष ३५ सैरसोबत
📚कथासंग्रह
१ आबी दुसरी आवृत्ती
२ कृष्णाकाठच्या कथा
३ खुळंवाडी
४ गजाआड पाचवी आवृत्ती
५ गुऱ्हाळ
६ चिरानगरची भुतं प्रथम आवृत्ती
७ नवती
८ निखारा
९ पिसाळलेला माणूस
७ फरारी
१० बरबाद्या कंजारी
११ भानामती
१२ लाडी दुसरी आवृत्ती
📚नाटके
१ इनामदार
२ पेंग्याचं लगीन
३ सुलतान
शाहिरी
१ शाहीर
🎹तमाशा
१ अकलेची गोष्ट २ कलंत्री
३ खापर्‍या चोर
४ दुष्काळात तेरावा
५ देशभक्त घोटाळे
६ निवडणुकीतील घोटाळे
७ पुढारी मिळाला ८ पेंग्याचं लगीन ९ बिलंदर बुडवे १०बेकायदेशीर
११ माझी मुंबई१२मूक मिरवणूक् १३ लोकमंत्र्यांचा दोरा
१४ शेटजीचं इलेक्शन
📖प्रवासवर्णने
१ माझा रशियाचा प्रवास
📝प्रसिद्ध पोवाडे
१ अंमळनेरचे अमर हुतात्मे
२ काळ्या बाजाराचा पोवाडा
३ तेलंगणाचा संग्राम
४ नानकीन नगरापुढे
५ पंजाब-दिल्लीचा दंगा
६ बंगालची हाक
७ बर्लिनचा पोवाडा
८ महाराष्ट्राची परंपरा
९ मुंबईचा कामगार
१० स्टलिनग्राडचा पोवाडा
🏤स्मारके संस्था
🎆महाराष्ट्रात अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक संस्था आहेत.
🎆त्यांच्या नावाने साहित्य संमेलने होतात.
🎆त्यांची अनेक स्मारके आहेत.
त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.
🎆त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील बिबवेवाडी येथे बांधले जात असलेले नाट्यगृह गेल्या आठ वर्षांत १९कोटी खर्चूनही आजतागायत (डिसेंबर २०१२) अपूर्ण आहे.
🎆मुंबईत जिजामाता उद्यानात (राणीच्या बागेत) आण्णा भाऊ साठे नावाचे खुले नाट्यगृह आहे.
🎆पुणे शहरात सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह नावाचे नाटकाचे थिएटर आहे.
📚अण्णा भाऊंच्या कादंबर्‍या
🌅‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणार्‍या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
🌅‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्‍या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे.
🌅‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.
📚अण्णा भाऊंच्या कथा
अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले
🌅‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.
🌅‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.
🌅‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.
🌅‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोर्‍यामार्‍या करणार्‍या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.
🌅‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात
🌅‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.
🌅‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.
🌅‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.
🌅‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.
🌅‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.
‘📚साहित्य संमेलने
🔷अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,
🔷लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,
🔷अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन,
🔷राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन
🏆पुरस्कार आणि सन्मान
🌻पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक (१९५८)
🌻१९६१ साली  फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार
  📝संकलन~ ✒धर्मेंद्र मेश्राम
                                                  www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा