🌲पुणे जिल्हा🌲
---------------
---------------
🎌राज्य महाराष्ट्र
🎌विभागाचे नाव पुणे विभाग
🎌मुख्यालय पुणे
🚩तालुके
१ जुन्नर २ आंबेगाव ३ खेड ४ मावळ ५ मुळशी ६ हवेली ७ वेल्हे ८ भोर ९ पुरंदर १० बारामती ११ इंदापूर १२ दौंड १३ शिरूर १४ पुणे शहर
१ जुन्नर २ आंबेगाव ३ खेड ४ मावळ ५ मुळशी ६ हवेली ७ वेल्हे ८ भोर ९ पुरंदर १० बारामती ११ इंदापूर १२ दौंड १३ शिरूर १४ पुणे शहर
🚩क्षेत्रफळ १५,६४२ चौरस किमी (६,०३९ चौ. मैल)
🚩लोकसंख्या ९९,२४,२२४ (२००१)
🚩लोकसंख्या घनता ४६१.८५ प्रति चौरस किमी (१,१९६.२ /चौ. मैल)
🚩साक्षरता दर ८०.७८
🚩लिंग गुणोत्तर १.०८ ♂/♀
⭐महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
⭐शिक्षण जगप्रसिद्ध पुणे
विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात.
विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात.
🔃ऐतिहासिक महत्त्वाचे
स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले.

🔱इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले.
◾पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, वेल्हे, मावळ व मुळशी हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
🔱पुणे जिल्ह्याच्या सीमा
उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेला रायगड जिल्हा वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेला रायगड जिल्हा वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
🔱पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. - भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे.भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो.
🔱 इतर नद्या पुढीलप्रमाणे -
मांडवी, कुकडी नदी ,मीना ,घोड नदी ,भामा ,इंद्रायणी नदी,पवना नदी, मुळा नदी, मुठा नदी, कऱ्हा ,नीरा
मांडवी, कुकडी नदी ,मीना ,घोड नदी ,भामा ,इंद्रायणी नदी,पवना नदी, मुळा नदी, मुठा नदी, कऱ्हा ,नीरा
🏭उद्योगधंदे
महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत.

🚈🚋🚋मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण,उर्से,बेबडओहल,आबी, टाकवे, हिंजवडी, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती व जेजुरी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
🌴शेती
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
🌴 ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इन्द्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे

🚝🚎🚎प्रेक्षणीय स्थळे
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.
आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.
🔔अष्टविनायकांपैकी पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात.
🌿🌿🍂जंगल (अभयारण्य),
नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते.
शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.
या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.

🔔🔔उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिर, चतु:शृंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर, चिंचवड येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत.
💥 महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
🔎राजकीय संरचना
🎈लोकसभा मतदारसंघ ( ४ ) :
पुणे ,बारामती,शिरूर व मावळ.
पुणे ,बारामती,शिरूर व मावळ.
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
🎈विधानसभा मतदारसंघ (२१) : जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी , भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ.
🍳जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
✈दळणवळण
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
🚘मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद। (राष्ट्रीय
महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात.
महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात.
🗾उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले आहेत.
🚊देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात.
🚂🚌मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे.
🚊पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
✈पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
संकलन~ ✒धर्मेंद्र मेश्राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा