राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


      
                                                          🙏राष्ट्रसंत तुकडोजी महाराज🙏
                                                       ----------------------------------
🔶मूळ नाव- माणिक बंडोजी इंगळे
🔷जन्म - एप्रिल २७, १९०९ यावली, जि. अमरावती
🔷निर्वाण - ऑक्टोबर ११, १९६८
🍁गुरू - आडकोजी महाराज
🍁भाषा- मराठी, हिंदी
🍁साहित्य रचना- ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
🍁कार्य - अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन.
🍁वडील - बंडोजी
🍁आई - मंजुळाबाई
             🔶तुकडोजी महाराज
(Tukdoji Maharaj) यांना
 राष्ट्रसंतम्हणून ओळखले जाते.
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनीग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदीभाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी१९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.🔶
  🔷तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपान
सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्याभारत छोडो आंदोलना
दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.🔷
   ⚡भारत हा खेड्यांचा देश आहे,
हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्राम
कल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.⚡
    🍀अमरावतीजवळ मोझरीच्या
गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मय
सेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन
म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.🍀
    💥खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.💥
            👏सर्वधर्मसमभाव हेही या
राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
       💢महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.💢
🙏राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती
 राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.🙏
        📓 ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.
📚साहित्य संम्मेलने
तुकडोजी महाराज यांच्या नावाने 📓(१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन
📓(२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन 
📖ग्रामगीता
ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
🍁संत देहाने भिन्न असती।
परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती।
तरी सिद्धान्तमति सारखी।।🍁
✒संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
🎵या झोपडीत माझ्या राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या दारास नाही दोर्‍या,
या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भिती नं यावयाला,
या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने,
कंदील शामदाने आम्हा जमीन माने,
या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा,
या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे,
या झोपडीत माझ्या॥७॥🎵
🎹राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन, हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते, हे भजन दिल्ली येथील राजघाटा वर नियमीत ऐकविले जाते.
🎵हर देश में तू ...हर देश में तू ,
हर भेष में तू , तेरे नाम अनेक
तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा,
सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥
सागर से उठा बादल बनके,
बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,
तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,
सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना,
सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,
वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और
दिखा, बस!
मै और तू सब एकही है ॥३॥🎵
____________________________
      🙏राष्ट्रसंतांना नमन 🙏
======================
               ✏आपण ओळख थोर
व्यक्तींची या उपक्रमांतर्गत महापुरुष/समाजसुधारक/लेखक/कवी/संत/शास्त्रज्ञ/वैज्ञानिक/क्रांतिकारक ई. यांची ओळख करून घेणार आहोत.
या उपक्रमाचा उपयोग आपल्याला परिपाठ,जयंती,विविध स्पर्धा परीक्षा,
पुण्यतिथिला  होऊ शकतो.👏
    📝संकलन~✒ धर्मेंद्र मेश्राम
                                              www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा