वाशिम जिल्हा

                                    वाशिम जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - वाशिम
क्षेत्रफळ - 5,153 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 11,96,714 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 6 - वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर,
मानोरा.
सीमा - उत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व
हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस
बुलढाणा जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून
वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.
वाशिमला पुरातन इतिहास आहे. वाशिमचे पुरातन नाव
वत्सगुल्म होते. वत्स ऋषीच्या नावावरून हे नाव आले असावे.
काही अवशेशावरून वाकाटक साम्राज्याचा संदर्भही
वाशिम सोबत जोडला आहे.
या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे.
पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून दक्षिण भाग
सखल प्रदेशाचा आहे.
या जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी
जमाती येथे प्रामुख्याने आढळतात.
प्रमुख स्थळे
वाशिम - येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि
बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
कारंजा - नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर
प्रेक्षणिय आहे.
तर्हाळा - हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध
आहे.
रिसोड - अमरदासबाबांचे मंदिर आहे.

                                      www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा