सोलापूर जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सोलापूर
क्षेत्रफळ - 14,895 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 11 - करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ,
पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला,
मंगळवेढे, अक्कलकोट.
सीमा - उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस
उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा,
दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस
पुणे जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर
(पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती
संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे.
भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व
घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये
ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या
गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस
व इंग्रज अधिकार्यांना पळवून लावले व तीन दिवस
जिल्ह्याचा कारभार सभांळला.
येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.
प्रमुख स्थळे
सोलापूर - येथील चादरी 'सोलापुरी चादर' या नावाने
विशेष प्रसिद्ध आहेत.
पंढरपूर - पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे.
येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून
आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक
दर्शनाला येतात.
अक्कलकोट - स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर.
करमाळे - येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर
प्रसिद्ध आहे.
बेगमपुर - ता. मोहळ - येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.
ब्र्म्ह्पुरी - हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे
यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे.
नान्नज - सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे
ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा
'माळढोक' या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य
प्रसिद्ध आहे.
महत्वाचे
सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
म्हणतात.
चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय.
सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती,
बोरी या नद्या वाहतात.
सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर,
कुर्डूवाडी, चिंचोळी येथे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी,
हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-
मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-
कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).
वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध
पवित्र क्षेत्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-
हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग.
चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे
जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे
डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती
सोलापूरचे होत.
www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा