उस्मानाबाद जिल्हा :

उस्मानाबाद जिल्हा :

जिल्हाचे मुख्य ठिकाण - उस्मानाबाद
क्षेत्रफळ - 7,569 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 16,60,311 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 8 परांडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब,
उमरगा, वाशी, लोहारा.
सीमा - उत्तरेस बीड जिल्हा, पूर्वेस लातूर जिल्हा,
दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सोलापूर जिल्हा,
वायव्येस अहमदनगर जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

उस्मानाबादचे पूर्वीचे नाव 'धाराशीव' असे होते. 1910
मध्ये तत्कालीन निजाम मीर-उस्मानअली याने या शहरास
स्वत:चे नाव दिले. तेव्हापासून हे शहर 'उस्मानाबाद' म्हणून
ओळखले जाते.
उस्मानाबाद हा जिल्हा प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध
आहे. कुंथलगिरीची नैन लेणी, चांभार लेणी व
धाराशीवलेणी या लेण्या प्रसिद्ध आहेत.
या जिल्ह्यातील तेर येथे उत्खननात रोमन संस्कृतीशी
जुळणार्या वस्तु सापडल्या. यावरून प्राचीन धाराशीवचा
ग्रीक व रोमन संस्कृतीशी संबंध असावा.
प्रमुख स्थळे -
उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील हजरत ख्याजा
शम्सुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान
आहे.
तुळजापूर - महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी
किंवा भवानी मातेच्या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध.
नळदुर्ग - हे ठिकाण भुईकोट किल्यामुळे प्रसिद्ध आहे.
'पाणी महल' हे नळदुर्गाच्या किल्यातील प्रमुख आकर्षण
आहे.
तेरणा - तेरणा हे ऐतिहासिक गाव बौद्धकालीन स्तूप व संत
गोरा कुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
परांडा - एकेकाळची निजामशाहीची राजधानी.
ऐतिहासिक किल्ला व संतकवी हंसराज स्वामीचा मठ.
डोणगाव - रामदास स्वामीचे पट्टाशिष्य कल्याणस्वामी
यांचा मठ व ख्वाजा बद्रुद्दीन साहेबांचा दर्गा यासाठी
प्रसिद्ध.
महत्वाचे :
तेर वस्तुसंग्राहालय कोणत्या जिल्हयात आहे? -
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणकोणत्या नाद्या
वाहतात? - गिरणा, सिना, मांजरा, तेरणा, बोरी, लावरज
उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख
बाजारपेठा कोणत्या? - उस्मानाबाद, उमरण, तुळजापूर,
कळंब
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या औधोगिक वसाहती
आहेत? - उस्मानाबाद, भूम, कळंब
उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण
लांबी किती? - मिरज-लातूर (नॅरोगेज), 30 कि.मी.
उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते कोणते? -
पुणे-सोलापूर-हैद्राबाद (क्र.9)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा