ठाणे

                               ठाणे

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - ठाणे
क्षेत्रफळ - 4,241 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 96,18,953 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 07 - शहापूर, भिवंडी, मुरबाड, ठाणे, कल्याण,
उल्हासनगर, अंबरनाथ.
सीमा - उत्तरेस पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र,
दक्षिणेस रायगड जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला
लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष -
राज्यात सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या जिल्हा,
ठाणे शहरास पूर्वी लष्करी स्थानक म्हणत. त्यावेळेस येथे
लष्करी तळ होता. त्यावरूनच या शहरास थाणा व पुढे ठाणे
असे नाव पडले.
ठाणे शहरात सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप
आहे. त्यांच्याच काळात या भागात बोद्ध धर्माचा
मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला.
प्रमुख स्थळे
ठाणे - कोपिनेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.
अंबरनाथ - डल्हासनगर तालुक्यातील मुंबई-पुणे
लोहमार्गावर हे शहर वसले आहे. अंबरेश्वराच्या क्षेत्रामुळे
या ठिकाणाला अंबरनाथ हे नाव पडले. या ठिकाणी
दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा कारखाना आहे.
4. पालघर
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - पालघर
क्षेत्रफळ - 5,766 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 14,35,178
तालुके - 05 - विक्रमगढ, डहाणू, वसई, पालघर, ओवळा-
मातीवडा
सीमा - उत्तरेस गुजरात राज्य व दादर-नगरहवेली हा
संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस अरबी समुद्र,
दक्षिणेस ठाणे जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून
नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष -
1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून
पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसईचा
भुईकोट किल्ला 23 मे 1739 रोजी थोरल्या बाजीराव
पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा यांनी
पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला.
प्रमुख स्थळे
पालघर - पालघर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून पालघर
जवळ 'तारापुर' येथे भारतातील पहिला अणुविधुत प्रकल्प
उभारण्यात आला आहे.
मनोर - वाहतुकीचे केंद्र
वसई - पोर्तुगीजाकडून चिमाजी आप्पांनी जिंकलेला
ऐतिहासिक किल्ला.
वसईची केळी व विडयाची पाने प्रसिद्ध.
बोर्डी - हे एक रमणीय ठिकाण असून येथील किल्ला
प्रेक्षणीय आहे. येथेच उद्वाडा हे पारशी लोकांचे पवित्र
स्थळ आहे.
जव्हार - आदिवासींची बहुसंख्या दिसून येते. त्यामुळे
आदिवासी उपाययोजणेमार्फत आदिवासींच्या
विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात.
ठाणे हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक महानगरपालिका
असलेला जिल्हा आहे.
ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका - 1. ठाणे, 2. नवी
मुंबई, 3. कल्याण-डोंबिवली, 4. भिवंडी-निजामपुर, 5.
उल्हासनगर, 6. मीरा-भाईदर या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील वाशी गावाच्या परिसरात नवी मुंबई
वसविली आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठा बोगदा पारसिक आहे.
ठाणे जिल्ह्याचे मुख्य पीक भात हे आहे.
पालघर जिल्ह्यात अणुशक्तीपासून वीज तयार करण्याचे
केंद्र तारापुर ला आहे.
पालघर जिल्ह्यात काचेच्या बांगड्या चिंचणी व तारापुर
येथे तयार होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा