रत्नागिरी

                                            रत्नागिरी

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - रत्नागिरी
क्षेत्रफळ - 8,208 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 16,12,672 (सन 2011 च्या जनगणनेसुसार)
तालुके - 9 - मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण,
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर (देवरुख), लांजे.
सीमा - उत्तरेस रायगड जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र,
दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला
लागून सातारा, सांगली व कोल्हापूर हे तीन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष -
रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रमध्ये अनेक केल्ले असलेला
जिल्हा म्हणून ओळखला जातो.
रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये फुरसे हे नाव असलेले विषारी
साप प्रामुख्याने आढळतात.
देशभक्त आणि समाज सेवकांचा जिल्हा. रत्नागिरीजवळच
कुरबुडे येथे सुमारे 6.5 किमी. लांबीचा आशियातील
सर्वात लांब बोगदा आहे.
प्रमुख स्थळे
किल्ले - अंजनवेलचा किल्ला, शिवकालीन रत्नदुर्ग, जयगड,
पूर्णगड, बाणकोट, मंडणगड, गोवळकोट, गोपाळगड,
यशवंतगड, महिपतगड, जिवयगड, आंबोळगड, समळगड, रसाळगड
इत्यादी अनेक किल्ले या जिल्ह्यात आहेत.
रत्नागिरी - लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान. वि.दा.
सावरकर यांच्या सामाजिक कार्याची सुरवात
रत्नागिरी मध्येच झाली. रत्नदुर्ग किल्ल्याच्या
पायथ्याशी भागेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सावरकरांनी
इ.स.1929 मध्ये बांधलेले पतितपावन मंदिर येथे आहे.
मालगुंड ते पूर्णगड - ईल्मेनाईटचे साठे आढळतात.
गणपतीपुळे - रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर
गणपतीपुळे हे ठिकाण एक पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनार्यावरील गणपती मंदिर अष्टविनायकांपैकी
एक स्थान.
गुहागर - हे तालुक्याचे ठिकाण असून येथील सुपारी व नारळ
प्रसिद्ध आहे.
हर्णे - दापोली तालुक्यात हर्णे हे बंदर असून सुवर्णदुर्ग हा
जलदुर्ग किल्ला या ठिकाणी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात औषधे
बनवण्याचे उधोग आंजर्ले व चिपळूण येथे आहेत.
देवरुखजवळ साडवली येथे सिट्रोनेला गवतापासून तेल
काढतात.
स्टेनलेस स्टीलची भांडी तयार करण्याचा उधोग
चिपळूणला आहे.
शाडू या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात.
पोलादी कानशी बनविण्याचा उधोग रत्नागिरी येथे आहे.
सिमेंट तयार करणे व होड्या बांधणे हे मोठे उधोग रत्नागिरी
आहेत.
रत्नागिरीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम आहे.
थिबाचा राजवाडा रत्नागिरीत आहे.
जहाज बांधण्याचा कारखाना मिर्या येथे आहे.
पावस गावी स्वामी स्वरूपानंदाची समाधी आहे.
दापोली तालुक्यात केळशी याकुबाबा यांचा दर्गा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक भात हे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ईल्मेनाईट खनिज सा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा