रमाई भीमराव आंबेडकर


     🌟रमाई भीमराव आंबेडकर🌟
🌺मृत्यू: २७ मे इ.स.१९३५
🌺वडील: भिकु धुत्रे (वलंगकर)
🌺आई: रुक्मिणी भिकु धुत्रे (वलंगकर)
🌺पती: भीमराव रामजी आंबेडकर
🌺अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
🌺रमाई भीमराव आंबेडकर (?? - २७ मे, इ.स. १९३५) या भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पत्नी.
🌸बालपण
🍀रमाईचा जन्म गरीब कुटुंबात झाला.
🍀दाभोळजवळील वंणदगावात नदी काठी महारपुरा वस्तीमध्ये भिकु धुत्रे (वलंगकर) पत्नी रुक्मिणी सोबत राहत असत.
🍀त्यांना ३ मुली व १ मुलगा. मोठी मुलगी दापोलीत दिली होती. होती. रमा, गौरा व शंकर.
🍀भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारा पर्यंत पोहचवत असे.
🍀त्यांना छातीचा त्रास होता. रुक्मिणी अजारी होती. त्यातच तिचा मृत्यु झाला.
🍀आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. गौरा व शंकर अजाण होते.
🍀काही दिवसात वडिल भिकू यांचे निधन झाले.
🍀पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीला जातात.
🌸विवाह
🍁इ.स. १९०८ या वर्षी. रामजी सुभेदार भिमरावांसाठी मुलगी पाहत होते.
🍁सुभेदारांना समजले भायखळा मार्केटजवळ वलंगकरांकडे लग्नाची मुलगी आहे.
🍁सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली.
🍁रमाई व भिमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केट मध्ये झाले.
🌸कष्टमय जीवन
🌼१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची खुप वाताहत होत होती.
🌼ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत.
🌼त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले.
🌼तीने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत.
🌼स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दु:खांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती.
🌸मृत्युसत्र
🍃दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता, अथांग प्रद्न्यान, आणि मृत्यु यांचे सर्जनशिल ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे रमाई.
🍃रमाईनं अनेक मरणं पाहिली.
🍃प्रत्येक मरणानं तीही थोडी थोडी मेली.
🍃मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यु.
🍃१९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यु.
🍃१९१४_१७ साली बाबा अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यु.
🍃ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यु.
🍃पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू.
🍃१९२१ बाबांचा मुलगा बाळ गंगाधर,
🍃१९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यु पाहीला.
🍂पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकटी पडली.
🍂घर चालवण्यासाठी तीन शेण गोवर्या वेचल्या. सरपणासाठी वणवण फिरली.
🍂पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जाई.
🍂बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सुर्योदयापुर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्या थापायला वरळीला जात असे.
🍂मुलांसाठी उपास करत असे
🌸निर्वाण
🌺रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता.
🌺इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता.
🌺मे १९३५ला तर आजार खुपच विकोपाला गेला. बाबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता.
🌺एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून
बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले.
🌺आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या.
🌺त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत.
🌺बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत.
🌺त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दु:खाचा फार मोठा आघात झाला,
🌺राजगृहासमोर (दादर) लाखो लोक जमले होते.
🌺यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला.
💐२७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वा. रमाईची प्राण ज्योत मावळली.
💐सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्याच रमाई माता त्यांना अंतरली होती.
💐 दुपारच्या २ वा. रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली.
   💥आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली💥
💐पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसा ढसा रडले.
💐जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्याद रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या
💐बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले
       📎संकलन -धर्मेंद्र मेश्राम, चंद्रपुर
=========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा