बाबा आमटे


                                                              🙏बाबा आमटे🙏

🔷पूर्ण नांव - मुरलीधर देवीदास आमटे
🔷जन्म - डिसेंबर २६, इ.स. १९१४
हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र
🔷मृत्यू - फेब्रुवारी ९, इ.स. २००८
🔶निवासस्थान - आनंदवन
🔶टोपण नाव - बाबा आमटे
🔶शिक्षण - बी.ए.एल.एल.बी.
🔶ख्याती - कुष्ठरुग्णांची सेवा
🔶जोडीदार - साधना आमटे
🔶अपत्ये - प्रकाश आमटे, विकास आमटे
🔶वडील - देवीदास
          🌠बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
🎆जीवन
              🍀मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.🍀
    🔶स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. 🔶
   🔷पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. 🔷
              🍁 राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.🍁
🎆कार्य
कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :
🌸आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
🌸सोमनाथ प्रकल्प - मूल (चंद्रपूर)
🌸अशोकवन - नागपूर
🌸लोकबिरादरी प्रकल्प - नागेपल्ली
🌸लोकबिरादरी प्रकल्प - हेमल
  कसा
💮बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक
विविध प्रयोग केले.
       🌇 ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत जोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे.🌇
📚साहित्य
📖बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत
📘'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्रह
📘'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य )
'माती जागवील त्याला मत'
📖बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
📔आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे
📔मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर)
📔बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
📔बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)
🏆आंतरराष्ट्रीय पुरस्कार
💐रॅमन मॅगसेसे पुरस्कार
💐डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - इ.स. १९८३ .
💐कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार .
💐संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, इ.स. १९९८
💐आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका इ.स. १९८९
💐टेंपल्टन बहुमान, अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी), इ.स. १९९०
💐पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर, इ.स. १९९१
💐पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार, इ.स. १९९१
💐राईट लाइव्हलीहुड अॅवॉर्ड, स्वीडन - इ.स. १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे )
🏆भारतीय पुरस्कार
💐पद्मश्री इ.स. १९७१
💐पद्मविभूषण इ.स. १९८६
💐अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६
💐महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई 💐फुलॆ पुरस्कार इ.स. १९९८
💐गांधी शांतता पुरस्कार इ.स. १९९९
💐सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९
💐महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे, इ.स. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
💐मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार इ.स. १९८५
💐पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार इ.स. १९८६
💐महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इ.स. १९७४
💐राष्ट्रीय भूषण पुरस्कार इ.स. १९७८
💐जमनालाल बजाज पुरस्कार इ.स. १९७९
💐एन डी दिवाण पुरस्कार इ.स. १९८०
💐राजा राम मोहनराय पुरस्कार इ.स. १९८७
💐भरतवास पुरस्कार इ.स. २००८
💐जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९८८
💐महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स. १९९१
💐कुमार गंधर्व पुरस्कार इ.स. १९९८
💐जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक इ.स. १९९८
💐डी.लिट - नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०
💐डी. लिट. - पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६
💐देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -
💐विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल
____________________________
  🙏 बाबा आमटे यांना नमन 🙏
======================
               ✏आपण ओळख थोर
व्यक्तींची या उपक्रमांतर्गत महापुरुष/समाजसुधारक/लेखक/कवी/संत/शास्त्रज्ञ/वैज्ञानिक/क्रांतिकारक ई. यांची ओळख करून घेणार आहोत.
या उपक्रमाचा उपयोग आपल्याला परिपाठ,जयंती,विविध स्पर्धा परीक्षा,
पुण्यतिथिला  होऊ शकतो.👏

         📋संकलन~✏ धर्मेंद्र मेश्राम
                                               www.jagtappravin.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा